जिल्हा बँकमाढाराजकीयसोलापूरस्थानिक बातमी

सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत महिला प्रतिनिधी मतदारसंघात सिंधू पाटील आणि अस्मिता गायकवाड यांची उमेदवारी; मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलची ताकद वाढली!

भाई एस. एम. पाटील तात्यांचा ४५ वर्षांचा सहकार क्षेत्रातील वारसा आता पुढच्या पिढीकडे; सिंधू पाटील यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, महिला प्रतिनिधी मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलकडून दोन महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. माजी आमदार स्व. भाई एस. एम. पाटील तात्या यांच्या स्नुषा सौ. सिंधू सुरेश (बाळासाहेब) पाटील आणि सौ. अस्मिता ताई सुरेश गायकवाड या उमेदवारी करत आहेत.

मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी

मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. या पॅनलमधून महिला प्रतिनिधी मतदारसंघात सिंधू पाटील आणि अस्मिता गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रतिनिधी मतदारसंघातील निवडणुकीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

भाई एस. एम. पाटील तात्यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ वारसा

माढा तालुक्याचे माजी आमदार स्व. भाई एस. एम. पाटील तात्या यांनी तब्बल ४५ वर्षे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले होते. तसेच पाच वर्षे त्यांनी बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने त्यांच्या स्नुषा सौ. सिंधू सुरेश पाटील यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

महिला प्रतिनिधी मतदारसंघात रंगणार लढत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध पॅनल आणि उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यात महिला प्रतिनिधी मतदारसंघात सिंधू पाटील आणि अस्मिता गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. सहकार क्षेत्रातील जुना अनुभव, राजकीय नेतृत्व आणि मतदारांचे पाठबळ या बाबींच्या जोरावर स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल किती यश मिळवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिनप्रभा माढा प्रतिनिधी

Related Articles

Back to top button