अक्कलकोटअध्यात्मधार्मिकस्थानिक बातमी

वटवृक्ष मंदिरातील स्वामी दर्शन व्यवस्थेचे नियोजन कौतुकास्पद; खासदार नीलेश लंके यांच्याकडून देवस्थान समितीचे कौतुक!

अक्कलकोट दिनप्रभा प्रतिनिधी

सर्व स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील दर्शन व्यवस्थेचे नियोजन अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी काढले.

खासदार नीलेश लंके यांनी नुकतीच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी खासदार नीलेश लंके यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी बोलताना खासदार नीलेश लंके म्हणाले की, देवस्थानमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन तसेच आरतीसाठी केलेली आसन व्यवस्था या सर्व बाबी अत्यंत समाधानकारक आहेत. चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी देवस्थान समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पाहून मनस्वी आनंद झाला.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ, शांततापूर्ण आणि समाधानकारक दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान समितीने केलेले नियोजन खरोखरच आदर्शवत आहे. दर्शन रांग, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची घेतली जाणारी काळजी कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अक्कलकोटचा सर्वांगीण विकास व्हावा, देवस्थानमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढावी आणि येथील दर्शन व्यवस्था अशीच आदर्श राहावी, अशी प्रार्थना त्यांनी स्वामी चरणी केली. तसेच देवस्थानच्या आगामी विकासकामांसाठी आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही खासदार नीलेश लंके यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी व्यंकटेश पुजारी, रुद्रय्या स्वामी, चंद्रकांत डांगे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव यांच्यासह स्वामीभक्त आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनप्रभा प्रतिनिधी | चंद्रकांत डांगे, अक्कलकोट

—

महत्त्वाची सूचना : या बातमीतील माहिती संबंधित प्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या तपशिलांवर आधारित आहे. काही माहितीमध्ये त्रुटी किंवा बदल असल्यास संबंधितांनी दिनप्रभा न्यूजशी संपर्क साधावा. वाचकांनीही कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची खात्री करावी.

AI ग्राफिक्स सूचना : बातमीसोबत वापरलेले AI निर्मित ग्राफिक्स हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचे असून त्यांचा प्रत्यक्ष घटनेशी तंतोतंत संबंध असेलच असे नाही.

Related Articles

Back to top button