Gamesक्रिकेटक्रीडासोलापूरस्थानिक बातमी

निमा प्रीमियर लीग सीझन २१ चा शुभारंभ; ‘पाणी वाचवा’ संदेशातून जलसंवर्धनाचा जागर


सोलापूर : निमा (NIMA) सोलापूरच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या ‘निमा प्रीमियर लीग सीझन २१’ (NPL 21) क्रिकेट स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘जय जवान जय किसान’ मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाच्या स्पर्धेची विशेष संकल्पना ‘पाणी वाचवा’ (Save Water) अशी असून, क्रिकेटच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम निमा सोलापूरने हाती घेतला आहे. या स्पर्धेला एसपी न्यूरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.



मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न


रविवारी सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अश्विन वळसंगकर (इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट, एसपी न्यूरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ. सुजय फडके (सीईओ, एसपी न्यूरो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल), श्री. रवी चव्हाण (प्राचार्य, जय जवान जय किसान स्कूल) आणि डॉ. विनायक टेंभुर्णीकर (माजी राष्ट्रीय अध्यक्ष, निमा) उपस्थित होते. मान्यवरांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक जनजागृती यांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

‘पाणी वाचवा’ थीममधून जलसंवर्धनाचा अनोखा संदेश

यंदाच्या NPL 21 स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी संघांना पाणी संवर्धन आणि जलजागृतीचा संदेश देणारी आकर्षक नावे देण्यात आली आहेत. पाण्याचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर आणि भविष्यातील जलसंकट याबाबत जनजागृती करण्यासाठी स्पर्धेची ‘Save Water’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. क्रिकेटच्या लोकप्रिय माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आयोजकांचा हा प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरत आहे.



‘पाणी वाचवा’ थीमवर आधारित आकर्षक संघांची नावे

यंदाच्या NPL स्पर्धेत पाणी संवर्धनाचा संदेश देणारी आकर्षक नावे संघांना देण्यात आली आहेत. वरिष्ठ गटामध्ये अक्षरा ॲक्वा सेव्हियर्स (डॉ. सचिन नरोटे), चैतन्य जलधारा (चैतन्य हॉस्पिटल), प्राईड ॲक्वा वॉरियर्स (प्राईड हॉस्पिटल), खुबा वॉटर रायडर्स (डॉ. संतोष खुबा) आणि आस्था ॲक्वा टायटन्स (डॉ. नीलरोहित पैके) हे संघ सहभागी झाले आहेत.
तसेच रघोजी हायड्रोस्ट्रायकर, एसएल जल जीवन वॉरियर्स (डॉ. लक्ष्मण अहिरसंग), मनोविश्व ड्रॉप सेव्हर्स (डॉ. नितीन भोगे), स्वस्तिक ॲक्वा टायटन्स (डॉ. अमित पेंडोर), फिनिक्स ब्लू प्लॅनेट स्ट्रायकर्स (डॉ. विवेक कांबळे), आर्यन ॲक्वा वॉरियर्स (डॉ. भुतडा) आणि तुंबळ H2O सेव्हियर्स (डॉ. शिरीष तुंबळ) या संघांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.



पहिल्याच दिवसापासून क्रिकेटचा थरार; रंगतदार सामन्यांना सुरुवात

उद्घाटन सोहळ्यानंतर मैदानावर क्रिकेटच्या चुरशीच्या सामन्यांना सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना सकाळी ८.३० वाजता आर्यन ॲक्वा वॉरियर्स आणि स्वस्तिक ॲक्वा टायटन्स यांच्यात रंगला. तर दुसरा सामना दुपारी १.३० वाजता फिनिक्स ब्लू प्लॅनेट स्ट्रायकर्स विरुद्ध मनोविश्व ड्रॉप सेव्हर्स यांच्यात खेळवण्यात आला. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



NPL समितीचे विशेष परिश्रम; निमा पदाधिकाऱ्यांचे सहकार्य
या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी NPL 21 समितीचे चेअरमन डॉ. ऋषिकेश जोकारे, सचिव डॉ. राहुल कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष डॉ. सुरेश धायगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, सचिव डॉ. अभिजीत पुजारी, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे आणि वुमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ. मराठे, सचिव डॉ. भांगे व कोषाध्यक्षा डॉ. देगांवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

खेळासोबत सामाजिक बांधिलकी; ‘पाणी आहे तर उद्या आहे’चा जागर

या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टरांमधील क्रीडाभावना, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी यांना प्रोत्साहन मिळत असून, ‘पाणी वाचवा’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती निमाचे प्रसिद्धीप्रमुख डॉ. उत्कर्ष वैद्य यांनी दि


दिनप्रभा सोलापूर प्रतिनिधी

Related Articles

Back to top button