अखिल परीट (धोबी) समाजाच्या शहर समित्यांची घोषणा; महिला, युवक व शहर समितीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर दिनप्रभा प्रतिनिधी : अखिल परीट (धोबी) समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूरच्या वतीने समाज संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी शहर महिला समिती, शहर युवक समिती आणि शहर समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
समाजाच्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती होती. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील महिला व युवकांना संघटित करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शहर महिला समिती
शहर महिला समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती मिरा गोरख माहागावकर यांची निवड करण्यात आली आहे.
– उपाध्यक्ष : सौ. गायत्री संदीप भोसले
– उपाध्यक्ष : सौ. शुभांगी गणेश वारे
– सचिव : सौ. गोदावरी सखाराम शिंदे
– खजिनदार : सौ. जयश्री रमाकांत साळुंखे
– कार्याध्यक्ष : श्रीमती वंदना सूर्यकांत गायकवाड
– संघटक : सौ. संगीता मोहन पंधारकर
– प्रसिद्धीप्रमुख : सौ. गौरी महेश काटकर
– प्रसिद्धीप्रमुख : सौ. अनुराधा सुरज शिंदे
शहर युवक समिती
शहर युवक समितीच्या अध्यक्षपदी श्री. पंकज अनिल काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– उपाध्यक्ष : राहूल सुरेश गायकवाड
– उपाध्यक्ष : श्री. सूरज राजेंद्र शिंदे
– उपाध्यक्ष : सूरज राजन काटकर
– उपाध्यक्ष : विजय बाळासाहेब वाघमारे
– उपाध्यक्ष : वैभव उत्तम गवळी
– सचिव : श्री. दत्तात्रय हरिदास गायकवाड
– कार्याध्यक्ष : विष्णू नारायण गायकवाड
– खजिनदार : श्री. सन्मित दत्तात्रय काटकर
– संघटक : श्री. सागर गोरख महागावकर
– सहसंघटक : श्री. संदीप सुधीर गवळी
शहर समिती
शहर समितीच्या अध्यक्षपदी श्री. दत्तात्रय विठ्ठलराव काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– उपाध्यक्ष : श्री. सुभाष नामदेवराव गायकवाड
– उपाध्यक्ष : श्री. शिवानंद गोपाळ ननवरे
– उपाध्यक्ष : श्री. अनिल सदाशिव तांदळे
– उपाध्यक्ष : श्री. नागेश रमेश पंधारकर
– सचिव : श्री. सचिन रघुनाथ मस्के
– सहसचिव : श्री. अंकुश मल्लिकार्जुन ननवरे
– खजिनदार : श्री. नितीन सुभाषराव काटकर
– कार्याध्यक्ष : श्री. नागेश रामचंद्र माडीकर
– संघटक : श्री. मनोज सुरेश घोडके
– सहसंघटक : श्री. मनोज बाबुराव पंधारकर
– प्रसिद्धीप्रमुख : श्री. सिध्दार्थ परीट (ननवरे)
नवीन पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे करण्यावर भर दिला जाणार आहे. महिला व युवकांचा संघटनात्मक सहभाग वाढविण्यासोबतच समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सत्य • समाज • संस्कार
सोलापूर विभागीय कार्यकारी संपादक : श्री. गणेश शिंदे




