
वरवडे, ता. माढा | प्रतिनिधी
वरवडे (ता. माढा) येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक (विज्ञान) विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात हा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विद्यमान खासदार धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते-पाटील यांच्या खासदार निधीतून विद्यालयास मिळालेल्या ७.५ किलोवॅट सौर पॅनेल व इंटरलॉक बोर्डचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मा. श्री. वसंत (नाना) देशमुख उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून नंदिकेश्वर विद्यालय, उपळाई (बु.), ता. माढा येथील प्रभारी मुख्याध्यापक मा. श्री. हनुमंत राजभट मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. अॅड. श्री. सुरेश ऊर्फ बाळासाहेब संपतराव पाटील राहणार आहेत.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. कुशाबा बापूराव होडगर यांनी सेवकवृंद, विद्यार्थी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या शैक्षणिक विचारांना उजाळा मिळणार असून, विद्यालयासाठी उपलब्ध झालेल्या सौरऊर्जा सुविधेचे उद्घाटनही यावेळी होणार आहे.




