Aditya Thackeray Solapur Visit: रणजित बागल यांनी पांडुरंग प्रतिकृती व भगवद्गीता देऊन केले स्वागत

सोलापूर : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सुरू असलेल्या दौऱ्याच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे काल रात्री उशिरा सोलापुरात आगमन झाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपसचिव महाराष्ट्र रणजित दादा बागल यांनी भगवंत पांडुरंगाची प्रतिकृती आणि पवित्र भगवद्गीता भेट देत अत्यंत साधेपणाने त्यांचे स्वागत केले.
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या स्वागत कार्यक्रमात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या दौऱ्यात मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक प्रश्नांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सचिन दादा बागल, माजी जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवासेना जिल्हाप्रमुख रमेश चौगुले, राम वाकसे, युवासेना शहरप्रमुख तुषार अवताडे, सोशल मीडिया सेल अध्यक्ष गणेश होटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
— दिनप्रभा न्यूज पोर्टल | सत्य, समाज, संस्कार





