औंढीत कै.पांडुरंग आण्णा बचुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ११ नोव्हेंबरपासून भव्य टेनिस बॉल खुली क्रिकेट स्पर्धा; विजेत्या संघाला ५५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक!

औंढी, ता. मोहोळ : प्रतिनिधी
कै. पांडुरंग आण्णा बचुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
औंढी (ता. मोहोळ) येथे कै. पांडुरंग (आण्णा) बचुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती तरुण मंडळ, औंढी यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल खुल्या क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, परिसरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विजेत्या संघासाठी आकर्षक पारितोषिके
या स्पर्धेतील विजेत्या संघाला ५५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाच्या संघाला ३३ हजार ५५५ रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघाला २१ हजार ५५५ रुपये, तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला १५ हजार ५५५ रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
विजेत्या संघांसाठी आकर्षक पारितोषिके; बक्षीस प्रायोजकांची नावे
या भव्य क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला ५५ हजार ५५५ रुपये रोख पारितोषिक असून, हे पारितोषिक श्री. अरिफ शेख (पुळूज, शारदानगर) यांच्याकडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या संघाला ३३ हजार ५५५ रुपये पारितोषिक श्री. स्वप्निल भुसे व श्री. संदीप बचुटे यांच्याकडून देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या संघाला २१ हजार ५५५ रुपये पारितोषिक श्री. तानाजी शिंदे (सरपंच) व श्री. राहुल भुसे (तालुका अध्यक्ष) यांच्याकडून, तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला १५ हजार ५५५ रुपये पारितोषिक श्री. डॉ. चंद्रकांत गुंड यांच्याकडून आहे. सहभागी खेळाडूंना टी-शर्टचे वाटप
या स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना श्री. विश्वतेज बचुटे यांच्याकडून आकर्षक टी-शर्ट देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण असून, आयोजकांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
या आकर्षक पारितोषिकांमुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार असून, क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष बक्षिसे
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठीही विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सलग चार षटकार मारणाऱ्या खेळाडूस २ हजार रुपये, सलग चार चौकार मारणाऱ्या खेळाडूस १ हजार ५०० रुपये, सलग तीन षटकार मारणाऱ्या खेळाडूस १ हजार ५०० रुपये, उत्कृष्ट झेल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन यांनाही ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
विविध मान्यवरांकडून सौजन्य
स्पर्धेचे ट्रॉफी सौजन्य श्री. बळीराम भुसे (चेअरमन, बबचुटे), छत्रपती तरुण मंडळ, औंढी यांच्याकडून देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय शिवण्या ट्रॅव्हल्स (औंढी) यांच्याकडून, तर बॉल सौजन्य रुचा मशिनरी (औंढी) यांच्याकडून करण्यात आले आहे.
पाच खेळाडूंची संघपद्धती; प्रवेश फी ५,५५५ रुपये
या स्पर्धेसाठी प्रवेश फी ५ हजार ५५५ रुपये ठेवण्यात आली आहे. सामने पाच खेळाडूंच्या संघपद्धतीने खेळविण्यात येणार असून, स्पर्धेचे नियम व अटी आयोजकांकडून निश्चित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण खेळाडूंना मिळणार क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी
या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. मोठ्या पारितोषिकांमुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार असून, औंढी परिसरात क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आण्णा भुसे यांनी केले आहे.
स्पर्धेचे ठिकाण : लोकनेते प्रशांतले समोर, औंढी, ता. मोहोळ, जि. सोलापूर.
संपर्क : आण्णा भुसे – ८९९९१५९६२६.
अधिक माहितीसाठी :
सागर बबचुटे – ८८३०४१६८२१
संग्राम उघडे – ९८३४३८२१२८
अजय डोके – ८६०५३१५९१६
विकास घोडके – ७९७२१७६१९७
दिनप्रभा मोहोळ प्रतिनिधी





