आनंदाचा शिधाग्रामीण महाराष्ट्रदिवाळीपंढरपूरस्थानिक बातमी

भोसें येथे ज्ञानेश्वरी महिला सहकारी पतसंस्थेच्या वतीने ‘किराणा किट’ वाटप; प्रा. तुकाराम मस्के यांची घोषणा

भोसें  (क.) : दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानेश्वरी महिला सहकारी पतसंस्था मर्या. भोसें यांच्या वतीने ‘किराणा किट’ वाटप व आनंदाचा शिधा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची घोषणा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगरचे संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी केली आहे.
शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता ज्ञानेश्वरी महिला सहकारी पतसंस्था मर्या. भोसें येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. पतसंस्थेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून दिवाळीचा आनंद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे चेअरमन, सचिव व संचालक मंडळाचे सहकार्य लाभत असून, आमदार अभिजीत (आबा) पाटील व स्नेहा परिवार यांच्या वतीनेही या उपक्रमाला सहकार्य करण्यात येत आहे.
सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे आणि सणासुदीच्या काळात आनंदाचे वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रा. तुकाराम मस्के यांनी जाहीर केले आहे.
(दिनप्रभा ग्रामीण प्रतिनिधी श्री. आकाश पवार )

Related Articles

Back to top button