तुळजापूरधार्मिकस्थानिक बातमी

लांबोटी येथे तुळजाभवानीच्या जयघोषात भाविकांचा जल्लोष; डीजेच्या तालावर धरला ठेका!

लांबोटी | दिनप्रभा ग्रामीण प्रतिनिधी : आकाश पवार

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लांबोटी परिसरात रात्रीच्या वेळी तुळजापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांनी डीजेच्या तालावर ठेका धरत आणि तुळजाभवानी मातेचा जयघोष करत मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला.

लांबोटी परिसरातून तुळजापूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची वाहनांवर तसेच रस्त्याच्या परिसरात गर्दी दिसून आली. डीजेच्या दणदणाटावर व जोशपूर्ण गीतांवर तरुणांसह अनेक भाविक उत्साहाने नाचताना दिसले. ‘आई तुळजाभवानीचा जयघोष’ करत भाविकांनी परिसर दणाणून सोडला.

हायमॅक्सच्या प्रकाशात भक्तिमय वातावरण

रात्रीच्या वेळी हायमॅक्स दिव्यांच्या प्रकाशात भाविकांची मोठी गर्दी आणि जयघोष यामुळे लांबोटी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर भक्ती, आनंद आणि उत्साह दिसून येत होता.

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी प्रवास करणाऱ्या भाविकांचा हा उत्साह धार्मिक श्रद्धा आणि सामूहिक भक्तिभावाचे दर्शन घडवणारा ठरला. भक्तिगीतांच्या तालावर जल्लोष करत भाविक तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

दिनप्रभा ग्रामीण प्रतिनिधी : आकाश पवार

दिनप्रभा न्यूज पोर्टल व न्यूज चॅनेल — सत्य • समाज • संस्कार

Related Articles

Back to top button