ग्रामीण महाराष्ट्रमहाराष्ट्र राजकारणराजकीयसोलापूरस्थानिक बातमी

तोंड उघडायला भाग पाडू नका; माझा इतिहास अख्ख्या फॅमिलीला माहीत आहे!’ जयकुमार गोरेंचा रोहित पवारांना थेट इशारा

सोलापूर दिनप्रभा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या टीकेला गोरे यांनी आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘पातळी सोडून टीका केली तर त्यापेक्षाही खालच्या पातळीवर उत्तर देता येते; मात्र आज दिवाळीचा दिवस असल्याने अधिक बोलणार नाही. तोंड उघडायला भाग पाडू नका, ज्यावेळी तोंड उघडेल त्यावेळी माझा इतिहास अख्ख्या फॅमिलीला माहीत आहे,’ असा थेट इशारा जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना दिला आहे.

रोहित पवारांची टीका नेमकी काय?

रोहित पवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, ‘ते बालाजी सरोवर या हॉटेलवर सकाळी कष्ट करतात, दुपारी कष्ट करतात आणि रात्रीही इतके कष्ट करतात की कधीकधी त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

‘मी असल्या फालतू लोकांच्या नादाला लागत नाही!’

रोहित पवारांच्या या टीकेला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘अशा फालतू आणि बावळट टीकेला उत्तर देण्याचे काही कारण नाही. मी असल्या फालतू लोकांच्या नादाला लागत नाही. पण लागलो तर पक्का लागतो.’

पुढे त्यांनी, ‘आज दिवाळीचा दिवस आहे म्हणून जास्त बोलत नाही. तोंड उघडायला भाग पाडू नका. ज्यावेळी तोंड उघडेल त्यावेळी माझा इतिहास अख्ख्या फॅमिलीला माहीत आहे,’ असे म्हणत रोहित पवारांना सूचक इशारा दिला.

दिवाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भडका!

दिवाळीच्या सणाच्या दिवशीच जयकुमार गोरे आणि रोहित पवार यांच्यातील शाब्दिक संघर्ष रंगला आहे. रोहित पवारांच्या टीकेला जयकुमार गोरे यांनी दिलेले प्रत्युत्तर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, या वादाला आता पुढे कोणते वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिनप्रभा प्रतिनिधी

Related Articles

Back to top button