बातमी
-
-
-
-
-
-
-
-
-
उसाला ५,००० रुपये दरासाठी राजू शेट्टी यांचा हुबळी आंदोलनाचा पुकार, सहभागी होण्याचे रायाप्पा हळणवर यांचे आवाहन
Read More »
दिनप्रभा न्यूज पोर्टल | कृषी | ईश्वर वठार
उसाला प्रति टन ५,००० रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार मा. श्री. राजू शेट्टी यांनी हुबळी येथे आंदोलनाचा पुकारा दिला आहे.
या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांची एकजूट दाखवावी, असे आवाहन श्री. रायाप्पा धोंडिबा हळणवर (मु.पो. ईश्वर वठार), जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत संघटना कर्नाटक यांच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. उसाला योग्य दर मिळावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे हळणवर यांनी आवाहनात म्हटले आहे.
“हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा असून प्रत्येक ऊस उत्पादकाने या आंदोलनात सहभागी व्हावे,” असेही श्री. रायाप्पा धोंडिबा हळणवर यांनी नमूद केले.