सोलापुरात प्रवीणसिंह परदेशी यांची उपस्थिती; आरोग्य, पाणीपुरवठा व ग्रामीण विकासाचा आढावा

सोलापूर दिनप्रभा प्रतिनिधी : जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी (IAS) यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
सोलापूर जिल्हा परिषद परिसरात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास तसेच नागरिकांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, उजनी धरणाशी संबंधित विविध प्रश्नांचाही आढावा घेण्यात आला. उजनी जलाशयातील जैवविविधता संवर्धन, स्थानिक माशांच्या प्रजातींचे संरक्षण तसेच मच्छीमारांच्या उपजीविकेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जैवविविधता आणि स्थानिक उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही माहिती देण्यात आली.
सोलापूर शहरातील विकास प्रकल्पांबाबतही संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या आढावा बैठकीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर प्रशासनाच्या स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
श्री. गणेश दत्तात्रय शिंदे
सोलापूर विभागीय कार्यकारी संपादक
📞 8605767640
— दिनप्रभा न्यूज पोर्टल
विश्वसनीय बातम्या… आपल्या परिसरातील




