news politicsकोल्हापूरमहाराष्ट्र राजकारणराजकीय
गोकुळ दूध संघ निवडणूक BreakingNews : महायुतीच्या जागावाटपाचे चित्र एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
गोकुळ दूध संघ निवडणूक BreakingNews : महायुतीच्या जागावाटपाचे चित्र एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
कोल्हापूर | दिनप्रभा न्यूज प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबतचे चित्र येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता असल्याची माहिती नामदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे अधिक ठराव आहेत, त्यांना तुलनेने अधिक जागा देण्याच्या सूत्रावर प्राथमिक एकमत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या जागावाटपामध्ये सुमारे ५ ते १० टक्क्यांचा फरक असून, तोही समन्वय बैठकीत सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे अंतिम जागावाटपाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोकुळ दूध संघ निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
✍️ कोल्हापूर विभागीय संपादक: श्री. डॉ. सतीश जगन्नाथ दाभाडे






