news politicsआंदोलनमहाराष्ट्र राजकारणराजकीयशेती
रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख मदतीची मागणी

विशेष वृत्त | दिनप्रभा न्यूज पोर्टल
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नसल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट प्रति हेक्टर १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
तुपकर यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा सोमवारपासून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.




