Pandharpur NCP Sharad Pawar Group Morcha: पंढरपूरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा धडक मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आणि राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाने शहराचे लक्ष वेधून घेतले.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालय, पंढरपूर येथे धडक देत प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.

या आंदोलनात खा. सुप्रिया ताई सुळे, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मोहोळचे आमदार राजू खरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नेत्यांनी शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पिकांच्या नुकसानीचे योग्य पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी भूमिका मांडली.
प्रमुख मुद्दे
कोरडा दुष्काळ तात्काळ जाहीर करण्याची मागणी
शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत
पिकांच्या नुकसानीची भरपाई
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा धडक मोर्चा झाला.




