वैरागमध्ये २३ नोव्हेंबरपासून ‘श्री संतनाथ प्रवचनमाला’; ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांचे प्रवचन

वैराग : श्री संत माणकोजी बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले (धामणगावकर-पंढरपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत वैराग येथे भव्य ‘श्री संतनाथ प्रवचनमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २३ नोव्हेंबर ते बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही प्रवचनमाला पार पडणार आहे.
या प्रवचनमालेमध्ये ‘राम म्हणता रामची होईजे…’ हा भक्तिमय आणि आध्यात्मिक विषय मांडण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनात आपण सातत्याने बोलत असतो. मात्र आपल्या बोलण्यामागील हेतू, शब्दांचे महत्त्व आणि नामस्मरणाचे सामर्थ्य याविषयी या प्रवचनातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
आपल्या वाणीला सामर्थ्य प्राप्त व्हावे, बोलण्यामध्ये सकारात्मकता यावी आणि जीवनात नामस्मरणाचे महत्त्व समजावे, यासाठी श्रीरामाच्या नामाचा महिमा या प्रवचनातून उलगडला जाणार आहे. संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशज गुरुवर्य ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या रसाळ वाणीतून भाविकांना आध्यात्मिक श्रवणाचा लाभ मिळणार आहे.
या प्रवचनमालेचे निमंत्रक ह.भ.प. डॉ. रंंगनाथ अंकुशराव काकडे (गुरुजी), मुख्य सचिव, अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर जिल्हा हे आहेत.
===========================
प्रवचनमालेचे वेळापत्रक व ठिकाण :
– दिनांक : सोमवार, २३ नोव्हेंबर ते बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६
– स्थळ : विद्यानगर, माढा रोड, वैराग
– वेळ : दररोज सायंकाळी ६.१५ ते ७.३०
– प्रवचनकार : ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले
===========================

यंदा या प्रवचनमालेचे बारावे वर्ष असून, परिसरातील भाविक, वारकरी संप्रदायातील मंडळी आणि अध्यात्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनप्रभा बार्शी प्रतिनिधी
=========================
खुलासा : ही बातमी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. बातमीमध्ये तथ्यात्मक त्रुटी किंवा तक्रार असल्यास वाचकांनी dinprabhanews@gmail.com या ई-मेलवर कळवावे. दिनप्रभा न्यूज योग्य पडताळणी करून आवश्यक ती दुरुस्ती करेल.




