Gamesक्रीडामाढाशैक्षणिकस्थानिक बातमीस्पोर्ट्स

तिरंगा चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नवभारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 

माढा | दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ | दिनप्रभा न्यूज प्रतिनिधी

अरण (ता. माढा) येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २०२६ मध्ये दारफळ येथील नवभारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.

या स्पर्धेत नवभारत विद्यालयाच्या शिवराज रंजित बारबोले याने १९ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. तसेच वेदांत विकास शिंदे याने १७ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळवले.

याशिवाय विद्यालयाच्या अमर अरुण बारबोले, सिद्धेश राजेंद्र कांबळे आणि आर्यन हरिदास गायकवाड यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गोल्ड मेडल पटकावले.

बुद्धिबळासारख्या बौद्धिक आणि कौशल्याधारित खेळात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे, एकाग्रतेचे आणि मेहनतीचे फलित असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. प्रदीप कांबळे सर (प्रयोगशाळा सहाय्यक) यांनी विशेष योगदान दिले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, दारफळ, नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या विद्यार्थ्यांनी भविष्यातही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विद्यालयाचे, दारफळ गावाचे तसेच माढा तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

— अशोक विनायक शिंदे

दिनप्रभा न्यूज, माढा प्रतिनिधी

मो. ९७६६९७६२६३

Related Articles

Back to top button