राजकीय
-
-
-
-
-
-
-
-
उसाला ५,००० रुपये दरासाठी राजू शेट्टी यांचा हुबळी आंदोलनाचा पुकार, सहभागी होण्याचे रायाप्पा हळणवर यांचे आवाहन
Read More »
दिनप्रभा न्यूज पोर्टल | कृषी | ईश्वर वठार
उसाला प्रति टन ५,००० रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार मा. श्री. राजू शेट्टी यांनी हुबळी येथे आंदोलनाचा पुकारा दिला आहे.
या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांची एकजूट दाखवावी, असे आवाहन श्री. रायाप्पा धोंडिबा हळणवर (मु.पो. ईश्वर वठार), जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत संघटना कर्नाटक यांच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. उसाला योग्य दर मिळावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे हळणवर यांनी आवाहनात म्हटले आहे.
“हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा असून प्रत्येक ऊस उत्पादकाने या आंदोलनात सहभागी व्हावे,” असेही श्री. रायाप्पा धोंडिबा हळणवर यांनी नमूद केले. -
दुष्काळावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा; सतेज पाटील यांची सरकारकडे मागणी
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने स्वतंत्र अधिवेशन बोलवावे आणि त्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली. फेब्रुवारी महिन्यातच हवामानाचा अंदाज उपलब्ध असतानाही वेळेत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे तत्काळ पाठवले गेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळावर सविस्तर चर्चा करून उपाययोजना निश्चित करण्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या अधिवेशनात प्रत्येक भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना आपल्या परिसरातील वस्तुस्थिती मांडण्याची संधी मिळावी. त्यातून शेतकऱ्यांना थेट आणि तातडीची मदत मिळेल, अशा निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.✍️ कोल्हापूर विभागीय
Read More » -
गोकुळ दूध संघ निवडणूक BreakingNews : महायुतीच्या जागावाटपाचे चित्र एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
Read More »
कोल्हापूर | दिनप्रभा न्यूज प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबतचे चित्र येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता असल्याची माहिती नामदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे अधिक ठराव आहेत, त्यांना तुलनेने अधिक जागा देण्याच्या सूत्रावर प्राथमिक एकमत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या जागावाटपामध्ये सुमारे ५ ते १० टक्क्यांचा फरक असून, तोही समन्वय बैठकीत सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे अंतिम जागावाटपाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोकुळ दूध संघ निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
✍️ कोल्हापूर विभागीय संपादक: श्री. डॉ. सतीश जगन्नाथ दाभाडे