दुःखद निधन : वै.यशवंतभाऊ पाटील यांच्या पत्नी पुष्पमाला पाटील यांचे निधन; भोसे येथे आज अंत्यविधी

भोसे | दिनप्रभा प्रतिनिधी
भोसे येथील यशवंतराव भाऊ गोपाळराव पाटील यांच्या पत्नी तसेच वै. राजुबापु पाटील यांच्या मातोश्री पुष्पमाला यशवंतराव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला असून, नातेवाईक, आप्तेष्ट आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुष्पमाला पाटील यांच्या निधनाने कुटुंबीयांनी सर्वांना मायेचा हात देणाऱ्या व्यक्तीला गमावले आहे. या कठीण प्रसंगी पाटील कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचे बळ मिळो आणि दिवंगत पुष्पमाला पाटील यांच्या आत्म्यास ईश्वरचरणी शांती लाभो, हीच प्रार्थना.
🕯️ अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता
दिवंगत पुष्पमाला यशवंतराव पाटील यांच्या पार्थिवावर आज, बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता, भोसे येथील त्यांच्या इनाम शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




