फडणवीसांचा पलटवार: “मतचोरीचा आरोप करणाऱ्यांचाच मेंदू चोरीला गेला

### फडणवीसांचा पलटवार: “मतचोरीचा आरोप करणाऱ्यांचाच मेंदू चोरीला गेला”; चौकशी समितीची उपरोधिक मागणी
मुंबई | दिनप्रभा न्यूज पोर्टल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतचोरीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार टीका केली. मतचोरीचे आरोप करणाऱ्यांचाच “मेंदू चोरीला गेला आहे,” असे म्हणत त्यांनी उपरोधिक भाषेत चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली.
फडणवीस म्हणाले, “हे मतचोरी झाल्याचा आरोप करत आहेत, पण प्रत्यक्षात यांचाच मेंदू चोरीला गेला आहे. मी पंतप्रधान महोदयांना विनंती करतो की, यासाठी एखादी चौकशी समिती तयार करता येईल का? ज्यांचा मेंदू चोरीला गेला किंवा गहाण ठेवला गेला आहे, तो त्यांना परत मिळवून द्यावा.”
मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.




