आळंदीत सद्गुरू जोग महाराज जन्मोत्सव सोहळा | ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांची भावपूर्ण कीर्तनसेवा


दिनप्रभा न्यूज | आळंदी प्रतिनिधी
श्रीक्षेत्र आळंदी येथे सद्गुरू जोग महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भक्तिमय सोहळ्यात संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज ह.भ.प. डॉ. श्री जयवंत महाराज बोधले (धामणगांवकर, पंढरपूर) यांची भावपूर्ण कीर्तनसेवा उत्साहात संपन्न झाली.
या कीर्तनसेवेत ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी वारकरी संप्रदायातील गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व उलगडून सांगताना पुढील अभंग सादर केला.

“श्री गुरु सारीखा असता पाठी राखा | इतरांचा लेखा कोण करी ||”
या अभंगातून सद्गुरूंच्या कृपेचे महत्त्व, भक्तीचा मार्ग आणि वारकरी परंपरेतील आध्यात्मिक मूल्यांचा संदेश उपस्थित भाविकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
यावेळी संस्थेचे विश्वस्त व ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय श्री केशव महाराज उखळीकर यांच्यासह पंढरपूरातील फडकरी महाराज मंडळी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (आळंदी), अखिल वारकरी गुरुकुल संघ आळंदी, प्रस्थानत्रय सेवा समिती पुणे तसेच समस्त आळंदीकर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





