राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सुस्ते येथील सौ. आश्विनी पवार यांची नियुक्ती!

पंढरपूर : दिनप्रभा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेत सौ. आश्विनी पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दुष्काळ : महिलांचे प्रश्न’ या कार्यक्रमादरम्यान त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महिला जिल्हाध्यक्षा सौ. पल्लवी सूर्यकांत पाटील यांच्या स्वाक्षरीने दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. या नियुक्तीमुळे सौ. आश्विनी पवार यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील महिला संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पंढरपूर येथील शिवम हॉल, जोगेश्वरी मिसळ, केबीपी कॉलेजसमोर येथे आयोजित ‘दुष्काळ : महिलांचे प्रश्न’ या कार्यक्रमात दुष्काळाचा महिलांच्या पाणी, रोजगार, उत्पन्न, आरोग्य, पोषण, शेती, कुटुंब आणि मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान, विद्याताई चव्हाण, आमदार आशाताई मिरगे, रोहिणीताई खडसे, प्रा. कविता म्हेत्रे, वर्षा निकम, अंजली साळवे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन महिला जिल्हाध्यक्षा सौ. पल्लवीताई सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान, आमदार जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला रोहिणीताई खडसे यांच्या विचारांनुसार पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच महिला संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रभावीपणे काम करणार असल्याचे नियुक्ती नंतर सौ. अश्विनी पवार यांनी सांगितले.
सौ. आश्विनी पवार यांच्या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दिनप्रभा न्यूज परिवाराकडून सौ. आश्विनी पवार यांचे हार्दिक अभिनंदन!
संपादक : श्री. डॉ. किरण दिनकर बोधले
खुलासा : ही बातमी उपलब्ध माहितीच्या आधारे तयार केली आहे. बातमीतील तथ्यात्मक त्रुटी किंवा तक्रार असल्यास dinprabhanews@gmail.com या ईमेलवर कळवावी. दिनप्रभा न्यूज योग्य पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती करेल.
AI ग्राफिक्सविषयक टीप : AI निर्मित ग्राफिक्स वापरल्यास ती केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची असतील.




